समूहदर्शक शब्द MCQ Quiz - Objective Question with Answer for समूहदर्शक शब्द - Download Free PDF

Last updated on Apr 3, 2025

Latest समूहदर्शक शब्द MCQ Objective Questions

समूहदर्शक शब्द Question 1:

ग्रंथामध्ये इतरांनी मागाहून घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे ?

  1. अनाहूत
  2. प्रक्षिप्त
  3. अनुसूची
  4. परिशिष्ट

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : प्रक्षिप्त

समूहदर्शक शब्द Question 1 Detailed Solution

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.

प्रक्षिप्त - ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर'.

प्रक्षिप्त म्हणजे  एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्‍या कुणीतरी मागाहून घातलेला.

उदा - तुकोबांच्या गाथेतील काही अभंग प्रक्षिप्त आहेत.

वरील दिलेल्याप्रमाणे 'ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर'या साठी प्रक्षिप्त हा योग्य शब्द आहे.

अशा प्रकारे वरील प्रक्षिप्त हा योग्य पर्याय आहे.

समूहदर्शक शब्द Question 2:

ज्याला मुळीच लिहीता व वाचता येत नाही अशा व्यक्ती म्हणजे _______

  1. साक्षर 
  2. अक्षर 
  3. निरक्षर 
  4. नवसाक्षर

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : निरक्षर 

समूहदर्शक शब्द Question 2 Detailed Solution

उत्तर निरक्षर 

Key Points

  • ज्याला मुळीच लिहीता व वाचता येत नाही अशा व्यक्तीला 'निरक्षर' म्हटले जाते.
  • निरक्षर व्यक्ती त्या व्यक्तीला संदर्भित करते ज्याला लेखन आणि वाचनाची मूलभूत क्षमता नसते.
  • त्यामुळे, असे व्यक्ती साहित्यिक संसाधनांपासून वंचित राहतात आणि समाजातील संवाद आणि अभ्यासातील अनेक संधींपासून दूर राहतात.
  • निरक्षरता व्यक्तीच्या वैयक्तिक आणि आर्थिक विकासावर परिणाम करू शकते, तसेच त्यांच्या सामाजिक सहभागावरही. शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराची पूर्तता करणे आणि निरक्षरता दूर करणे यासाठी अनेक सरकारी आणि खासगी उपक्रम राबविले जातात.

 

समूहदर्शक शब्द Question 3:

चुकीची जोडी ओळखा ?

  1. शहनाई - बिस्मिल्ला खान 
  2. तबला - झाकीर हुसेन
  3. सतार - पंडित रविशंकर
  4. यापैकी नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : यापैकी नाही

समूहदर्शक शब्द Question 3 Detailed Solution

उत्तर: यापैकी नाही

स्पष्टीकरण:

  • १) शहनाई - बिस्मिल्ला खान,
  • २) तबला - झाकीर हुसेन, आणि
  • ३) सतार - पंडित रविशंकर हे तिन्ही जोड्या योग्या आहेत कारण त्यांच्या नावांवर या विशेष वाद्यांचे अभ्यासक आहेत.
  • उत्तर आहे - ४) यापैकी नाही.

समूहदर्शक शब्द Question 4:

'मिताहारी' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. 

  1. मोजका आहार नेमाने घेणारा.
  2. मोजका हार घालणारा. 
  3. मोजके शब्द बोलणारा
  4. मोजके पैसे खर्च करणारा.

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : मोजका आहार नेमाने घेणारा.

समूहदर्शक शब्द Question 4 Detailed Solution

उत्तर - मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ मोजका आहार नेमाने घेणारा होय.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Additional Information

  • मोजके शब्द बोलणारा म्हणजे मितभाषी होय.
  • मोजके पैसे खर्च करणारा म्हणजे मितव्ययी होय.

समूहदर्शक शब्द Question 5:

खालील शब्द समुहाबद्दल एक अचूक शब्द शोधा -

केलेले उपकार विसरणारा -

  1. कृतज्ञ
  2. पापी
  3. कृतघ्न
  4. पुण्यवान

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : कृतघ्न

समूहदर्शक शब्द Question 5 Detailed Solution

उत्तर - केलेले उपकार विसरणारा म्हणजे कृतघ्न होय.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Additional Information

  • केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ होय.
  • पुण्यवान म्हणजे सत्कृत्य करणारा होय.
  • पापी म्हणजे पाप करणारा होय.

Top समूहदर्शक शब्द MCQ Objective Questions

सभेत धीटपणे बोलणारा, या शब्दसमुहासाठी अचूक शब्द कोणता ?

(a) सभिष्ट

(b) वक्ता

(c) सभाधीट

(d) व्याख्याता

  1. फक्त (a) बरोबर
  2. फक्त (b) आणि (d) बरोबर
  3. फक्त (c) बरोबर
  4. फक्त (a) आणि (d) बरोबर

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : फक्त (c) बरोबर

समूहदर्शक शब्द Question 6 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर- फक्त (c) बरोबर

शब्दसमूहाबद्दल एक शब्द:

  • आपण बोलताना अनेकदा शब्दांची काटकसर करत असतो. म्हणजे एखादा शब्द असा वापरतो की ज्यामधून अनेक शब्दांनी व्यक्त होणारा, प्रकटणारा, आशय सांगितला जातो. 
  • उदा. गाणे गाणारा, शिल्पे बनवणारा, नृत्य करणारा किंवा अगदी नकला करणारा माणूस असला की आपण सहज त्याचा उल्लेख 'कलाकार' किंवा 'कलावंत' असा करतो. 
  • अशाच पद्धतीने कितीतरी शब्द आपण वापरत असतो. त्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते, नेमकेपणा येतो. याच प्रकाराला व्याकरणात 'शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरणे' असे म्हणतात.


सभेत धीटपणे भाषण करणारा किंवा बोलणारा- सभाधीट असतो.

अशा प्रकारे फक्त (c) बरोबर असा पर्याय योग्य आहे.

'क्रांती' या शब्दासाठी योग्य शब्दसमूह निवडा.

  1. त्वरित कृती
  2. अचानक आलेले संकट
  3. हळू हळू घडून येणारा बदल
  4. अकस्मात घडून आलेला बदल

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : अकस्मात घडून आलेला बदल

समूहदर्शक शब्द Question 7 Detailed Solution

Download Solution PDF

​ शब्दसमूह : अनेक शब्दांनी शब्दसमूह बनतो. या शब्दसमूहातून जो अर्थ प्राप्त प्राप्त  होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे  शब्दसमूहाबद्दल एक शब्द होय.

Important Points

वरील  वाक्यात क्रांती या शब्दासाठी अकस्मात घडून आलेला बदल हा योग्य शब्दसमूह आहे .

अचानक आलेले संकट  घाला 
हळू हळू घडून येणार बदल  उत्क्रांती 
अकस्मात घडून आलेला बदल  क्रांती 

समूहदर्शक शब्‍द सांगा.

पिकत घातलेल्‍या आंब्‍यांची ----------- असते.

  1. गाथण
  2. थप्‍पी
  3. अढी
  4. रास

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : अढी

समूहदर्शक शब्द Question 8 Detailed Solution

Download Solution PDF
समूहदर्शक शब्द- समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा  किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय.

वरील दिलेल्या  प्रश्नात पिकत घातलेल्या  आंब्यांची अढी असते.

Additional Information

 खालील दिलेले  सर्व योग्य सामूहिक शब्द आहेत 

 शब्द 

 समूहदर्शक शब्द 

काजूंची ,माश्यांची  गाथण 
पोत्यांची ,नोटांची  थप्पी 
आंब्यांची  अढी 
धान्याची  रास 

'निळ्या रंगाचे एक रत्न' या शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. 

  1. इंद्रनीळ
  2. नीलकंठ
  3. घननीळा
  4. नीलांबर

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : इंद्रनीळ

समूहदर्शक शब्द Question 9 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - निळ्या रंगाचे एक रत्न या शब्द समूहाबद्दल एक शब्द इंद्रनीळ हा होईल.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Additional Information

  • नीलकंठ म्हणजे निळा आहे कंठ ज्याचा तो (भगवान शंकर) होय.
  • घननीळा म्हणजे निळा असा घन होय.
  • नीलांबर म्हणजे निळे असे आकाश होय.

खालीलपैकी योग्‍य पर्याय निवडा.

काजूंची असते______.

  1. तुकडी
  2. गाथण
  3. चळत
  4. जुडी

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : गाथण

समूहदर्शक शब्द Question 10 Detailed Solution

Download Solution PDF

समूहदर्शक शब्द- समूहदर्शक शब्द म्हणजे एखाद्या वस्तूंचा किंवा गोष्टींच्या एकत्रित गटाला दिलेली उपमा होय.

काजूंची असते ती ___ यासाठी प्रस्तुत पर्यायांपैकी  गाथण हा योग्य पर्याय आहे. Additional Information

अन्य पर्यायांचे स्पष्टीकरण-

  1. सैनिकांची- तुकडी
  2. नाण्यांची- चळत
  3. दुर्वांची- जुडी

स्वतःशी केलेले भाषण

  1. संभाषण
  2. सुभाषित
  3. स्वगत
  4. समारोप

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : स्वगत

समूहदर्शक शब्द Question 11 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - स्वतःशी केलेले भाषण म्हणजे स्वगत होय.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होणे होय.

Additional Informationसंभाषण म्हणजे एकापेक्षा अधिक माणसांचे आपसातील बोलणे होय.

सुभाषित म्हणजे बोधपर वचन होय.

एखादी गोष्ट संपण्याची क्रिया म्हणजे समारोप होय.

'सिंहावलोकन' म्हणजे काय ?

  1. मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे
  2. सिंहाचे दुरून अवलोकन करणे
  3. राज्य कारभार पाहणे
  4. वरवर पहाणी करणे

Answer (Detailed Solution Below)

Option 1 : मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे

समूहदर्शक शब्द Question 12 Detailed Solution

Download Solution PDF

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.

सिंहावलोकन हा एक शब्दसमूह आहे.

सिंहावलोकन म्हणजे मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे.

भूतकाळातील गोष्टींचा आढावा घेऊन वर्तमानकाळात योग्य त्या दिशेने पावले उचलणे तसेच आपण मागील काळात केलेल्या गोष्टींची योग्य चिकित्सा करणे म्हणजेच सिंहावलोकन होय.

जसे धान्याची रास, तसे नाण्यांकरीता समूहदर्शक शब्द कोणता.

  1. ढीग
  2. चळत
  3. पुंजका
  4. जुडी

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : चळत

समूहदर्शक शब्द Question 13 Detailed Solution

Download Solution PDF

उत्तर - जसे धान्याची रास, तसे नाण्यांकरीता समूहदर्शक शब्द चळत हा होईल.

समूहदर्शक शब्द - एकापेक्षा अधिक व्यक्ती, वस्तू, प्राणी समूहाला दर्शविण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला समूहदर्शक शब्‍द असे म्हणतात.

Additional Informationनारळांच्या किंवा विटांच्या किंवा कलिंगडांच्या समूहाला ढीग म्हणतात.

ताऱ्यांच्या समूहाला पुंजका म्हणतात.

दुर्वांच्या किंवा पालेभाजीच्या समूहाला जुडी म्हणतात.

'मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

  1. मुदपाकखाना
  2. स्वैपाकघर
  3. सदावर्त
  4. भोजनगृह

Answer (Detailed Solution Below)

Option 3 : सदावर्त

समूहदर्शक शब्द Question 14 Detailed Solution

Download Solution PDF

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.

मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण या शब्दसमूहासाठी सदावर्त हा योग्य शब्द आहे.

सदावर्ताचा अर्थ-

  • अन्न वाटपाचे व्रत, गोरगरिबांना आणि भुकेल्यांना सतत अन्नदान, नियमितपणे दिले जाणारे दान
  • उपवास, दैनंदिन धर्मादाय संस्थांनुसार ठराविक कालमर्यादेसाठी गरिबांना अन्न व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा कायदा किंवा नियम

Additional Information

वरील पर्यायांचे अर्थ खालीलप्रमाणे आहेत.

  • मुदपाकखाना म्हणजे जिथे अन्न शिजविले जाते.
  • स्वयंपाकघर म्हणजे ज्या ठिकाणी भोजन बनविले जाते.
  • भोजनगृह म्हणजे भोजन करण्याचे ठिकाण.

'मितभाषी' म्हणजे काय ?

  1. कमी भाषा बोलणारा
  2. मोजके बोलणारा
  3. भाष्य करणारा
  4. अजिबात न बोलणारा

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : मोजके बोलणारा

समूहदर्शक शब्द Question 15 Detailed Solution

Download Solution PDF

मितभाषी हा एक शब्दसमूह आहे.

शब्दसमूह : अनेक शब्दांनी जो अर्थ प्राप्त होतो त्याच अर्थासाठी एकच शब्द वापरणे म्हणजे शब्दसमूह होय.

मितभाषी म्हणजे मोजकेच बोलणारा 

  • जे लोक थोडेच पण अर्थपूर्ण बोलतात त्यालाच मोजके बोलणारे किंवा मितभाषी असे म्हणतात.

Additional Information

  • वरील पर्यायांपैकी भाष्य करणारा म्हणजे भाषक होय.
  • तर कमी बोलणारा व अजिबात न बोलणारा यांना अबोल असे म्हणतात.
Get Free Access Now
Hot Links: teen patti star login online teen patti teen patti master official teen patti casino download teen patti 51 bonus